दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर – पाचपावली पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा टाकून दोन भावांना अटक केली. राहुल ऊर्फ रवी अशोक निनावे (वय ३५) व चंदू अशोक निनावे (वय ३१, दोन्ही रा. पाचपावली) ही अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघेही अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. सुरोशे, हेडकॉन्स्टेबल प्रेमदास वर्धे, शिपाई विश्वास, सचिन, दिनेश, चेतन व स्वाती मोहोड गस्त घालत होते. निनावे बंधू अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दारु अड्ड्यावर छापा टाकून दोघांना अटक केली. दोघांकडून देशी दारुच्या साठ्यासह हातभट्टीची दारु जप्त केली.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….