मनीष सिसोदिया यांच्या ईडी आणि सीबीआय कोठडीत वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिवसेंदिवस आपचे प्रमुख नेते आणि पक्षाच्या अडचणीत वाढ होत आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आप नेते मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सिसोदीया यांची आज ईडी आणि सीबीआय कोठडी संपली. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान त्याची ईडी कोठडी २९ एप्रिलपर्यंत तर सीबीआय कोठडी २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
काय आहेत आरोप
मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा ईडी तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन 5 टक्क्यांवरून वाढवून 12 टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे याशिवाय मद्य धोरण बदलण्यातील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरु आहे. घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे.