इमरान खान यांची जेलमध्ये “आयएएस” कडून हत्या ; “पाक” च्या माजी पंतप्रधानांच्या बातमीने धुमाकूळ, नेमकं सत्य..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
इस्लामाबाद :- “पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची जेलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
एकीकडे भारत पाकिस्तान यांच्यातील तणावाची स्थिती असताना आणि सीजफायवर दोन्ही देशांकडून झालेल्या चर्चेनंतर झालेल्या निर्णयाच्या गडबडीतच इम्रान खान यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. परंतु पाकिस्तानी मीडियाने सोशल मीडियावरील सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रकानुसार, इम्रान खान यांची शनिवारी मृत्यूच्या बातमीने सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तथापि, पाकिस्तानी माध्यमांनी इम्रान खानच्या हत्येची बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल ट्रोलर्सनाही दोषी ठरवले आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला आहे की इम्रान खान तुरुंगात “सुरक्षित आणि निरोगी” आहेत.
व्हायरल पत्रकात काय करण्यात आला दावा!
शनिवारी, सोशल मीडियावर एक बातमी पसरली ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची त्यांच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयने तुरुंगात हत्या केली आहे. तुरुंगात विष देऊन इम्रान खानची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तथापि, पाकिस्तानी माध्यमांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. ते खोटे असल्याचा दावा केला आहे. परंतु या बनावट बातमीच्या संदर्भात पाकिस्तान किंवा तुरुंग अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा विधान जारी केलेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झाले पत्र
सोशल मीडियावर एक प्रेस रिलीज देखील फिरत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ते पाकिस्तान सरकारने जारी केले आहे. प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की, “माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे न्यायालयीन कोठडीत निधन झाल्याची आम्ही अत्यंत खेदाने आणि गंभीरतेने पुष्टी करतो. ही घटना अशा परिस्थितीत घडली ज्याची सध्या सखोल चौकशी सुरू आहे.
प्रेस रिलीजमध्ये पुढे म्हटले आहे की, “या घडामोडींमुळे देशभरात आणि त्यापलीकडेही धक्का बसला आहे आणि पाकिस्तान सरकार परिस्थितीचे गांभीर्य मान्य करते. या दुःखद घटनेमागील कारणे आणि जबाबदारी निश्चित करताना आम्ही पूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
“पाकिस्तानने नेहमीच जीवनाचे पावित्र्य आणि कायद्याचे राज्य राखले आहे. मानवी हक्कांचे संरक्षण, विशेषतः कोठडीत, हे आपल्या लोकशाही चौकटीचा एक आधारस्तंभ आहे. विश्वासार्ह आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी सरकार संबंधित संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्था आणि स्वतंत्र निरीक्षकांशी सक्रियपणे संवाद साधत आहे.”

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..