भिम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा जाहीर सत्कार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून पुसद येथे पत्रकार बांधवांचे यथोचित सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत वासनिक सुधीर देशमुख, सैय्यद इस्ताक भाई , प्राध्यापक सुनील खाडे सर सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक दिनकर गुल्हाने यांनी भूषविले ज्येष्ठ पत्रकार अखिलेश अग्रवाल पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल चेडकाळे प्राध्यापक जनार्दन गजभिये हे प्रामुख्याने सदर कार्यक्रमास उपस्थित होते प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुनील खाडे सर यांनी केले प्राध्यापक डॉक्टर प्रशांत वासनिक यांनी पत्रकार दिनाचे महत्त्व सांगून पत्रकार बांधव हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हा दळमळता कामा नये अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले सुधीर देशमुख यांनी सुद्धा आपले विचार मांडले बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 सन मराठी दर्पण नावाचे वृत्तपत्र चालू केले तेव्हापासून सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत असून या दिवशी पत्रकारांना सन्मान देण्यात येतं आहे तसेच सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज यांनी सुद्धा पत्रकार दिनानिमित्त आपले विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेखणी किती प्रबळ होती त्याचप्रमाणे पत्रकार यांनी सुद्धा आपले लेखनी प्रबळ करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा असे विचार त्यांनी मांडले कार्यक्रमाचे आयोजक किशोर कांबळे यांनी पत्रकारांच्या सत्कार समारंभात जास्तीत जास्त पत्रकार उपस्थित राहिल्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख पाहुणे व भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व पत्रकार बांधवांना शाल धरणी व पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा येथे सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गोटे सर यांनी केले तर शेवटी कार्यक्रमाचे आयोजन कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी के करिता प्रभाकर खंदारे विष्णू सरकटे अण्णा दोडके प्रीतम आळणे दीपक गायकवाड राहुल धुळधुळे जनार्धन झोडगे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी गीता ताई कांबळे नारायण दुर्गे गौतम खडसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खूप परिश्रम घेतले

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….