‘एक घाव दोन तुकडे करूनच टाका, पण हा खेळ थांबवा’, बच्चू कडूंनी शिंदे-फडणवीसांना थेट सांगितलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा उद्विग्न होत त्यांची खंत व्यक्त केली आहे. 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं, त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘संजय शिरसाट यांचं म्हणणं बरोबर आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका. आता आमदारांमध्ये कुजबूज वाढली आहे. विस्तार नसेल करायचा तर स्पष्ट सांगा.
विस्तार नाही केला तरी आम्ही शिंदेंसोबत राहूच. मात्र हा भुलाबाईचा खेळ थांबवला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. राज्यामध्ये सत्तातंर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला, पण अजूनही संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्यात महिला मंत्र्यांचा समावेश असेल, असं सांगितलं होतं.
काय म्हणाले संजय शिरसाट? 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे विस्ताराला खीळ बसली आहे. विस्ताराबद्दल कुणावरही दबाव नाही. माझ्या बद्दल जो निर्णय होईल, तो मला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. संजय शिरसाट आणि बच्चू कडू हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, तसंच या दोघांची नावंही मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे उघड नाराजीही व्यक्त केली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….