शिंदे गटाचे तीन आमदार संपर्कात :- अमोल मिटकरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास असता तर नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल. आमच्या म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही.
त्यांना एवढी तरी अक्कल असावी
उच्च शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक किंवा ती प्रतिक्रिया लोकशाहीला धरून नाही. एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. तुम्हा एवढी तरी अक्कल असावी की आपण कॅबिनेट मंत्री आहोत. महापुरूषांविषयी असे कसे बोलू शकतात ?. पण या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….