भाजपशी जवळीक वाढत असताना राज यांचं मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठं विधान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- राज ठाकरेंचा कोकण दौरा उद्यापासून सुरु होत आहे. त्यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात जावून अंबाबाईचं दर्शन घेतलं.
सध्या राज ठाकरेंची भाजपशी जवळीकता वाढत आहे. मात्र त्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या बाबतीत मोठं विधान केलं आहे. मुंबई महानगर पालिका स्वतंत्र लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.
पत्रकारांशी संवाद साधतांना राज ठाकरे म्हणाले की, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन कोकण दौरा सुरु करत आहे. उद्या १० वाजता देवीचं दर्शन झाल्यानंतर सावंतवाडीला जाईन. कोकण दौरा आटोपल्यावर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं राज यांनी सांगितलं.
राजकीय प्रश्नांवर बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, रणनिती कुणी सांगतं का? कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो. बालेकिल्ले हलत नाहीत, असं होत नाही. प्रत्येक पक्षाचं संघटनेचं अंतर्गत काम सुरु असतं. ते जाहीर करण्याची गरज आहे. कोल्हापूर मनपा मनसे स्वतंत्र लढवणार आहे.
मुंबई महानगरपालिकेबाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईची मनपा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. सध्या महाराष्ट्राचा दौरा सुरु असून निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असल्याचं त्यांनी सांगितलं.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….