गुजरात निवडणुक ; काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जारी, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांचा समावेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून गुजरात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. यंदा आम आदमी पार्टी देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं चूरस पहायला मिळू शकते.
गेल्यावेळी राज्यात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. यंदा देखील गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे काँग्रेसने देखील तयारी सुरू केली असून, काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 40 जणांचा समावेश आहे. यादीत कोणाचा समावेश ?
या यादीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियकां गांधी, द्विगविजय सिंग, मलिक्कार्जून खर्गे, कमलनाथ, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, सचिन पायलट, राजू शर्मा, पवन खेरा, कन्हय्या कुमार, भुपेद्र सिंग हुड्डा, या प्रमुख नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण आणि शिवाजीराव मोघे यांचा समावेश करण्यात आला आहे.
भाजपाची जय्यत तयारी गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्य असल्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. गेल्यावेळी भाजपाने गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती.
यावेळी देखील भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे काही नेते गुजरातमध्ये प्रचाराला जाणार आहेत. तर काँग्रेसकडून देखील आता आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
आप निवडणुकीच्या रिंगणात गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये यंदा चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण यंदा अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. काही महिन्यांपूर्वीच आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये काँग्रेसला धोबीपछा़ड देत सत्ता काबीज केली होती. त्यामुळे निश्चितच आपचा आत्मविश्वास वाढला आहे. आता पक्षाने गुजरात विधानसभेवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे.