दिल्ली हादरली….! भुकंपानंतर नागरिक घरातून बाहेर पळाले, तीव्रता ५.४ रिश्टर स्केल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.
एकाच आठवड्यात दिल्ली आणि आजुबाजूच्या परिसरातील भूकंपाची ही दुसरी घटना आहे. या भूकंपाची तीव्रता ५.४ रिक्श्टर स्केल एवढी नोंद करण्यात आली आहे. यावेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच होता. भूकंपाचा आवाज आल्यानंतर लोकांनी घरातून आणि उंच उंच इमारतीतून बाहेर पलायन केल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे.
दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राम येथील लोकांनाही भूकंपाची तीव्र धक्का बसला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ७.५८ वाजता हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. भूकंपाचा केंद्र जमीनीपासून १० किमी खोल असल्याचे विभागाने ट्विटद्वारे म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी ९ नोव्हेंबर रोजी दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. त्यावेळी, रात्री १.५७ वाजता हे धक्के बसले होते.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….