उद्धव ठाकरे लवकरच करणार महाराष्ट्र दौरा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, यापूर्वी त्यांनी शिवसेना उपनेत्यासोबत बैठक घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे महाराष्ट्र फिरत आहेत तुम्हीही लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. सर्व उपनेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढा. असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आपण आपली कामं जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. त्यासाठी आपल्या प्रत्येक घराघरात पोहचावं लागणार आहे. असे आवहान करत आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा अर्थ जनता आपल्या सोबत आहे. असे ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
यासोबतच आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेदेखील महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. लवकरच ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
सध्या आदित्या ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पक्ष बांधणीला सुरूवात केली आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र दौर करत आहेत. यादरम्यान त्यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत हे बेकायदेशीर सरकार आहे, कोसळणार म्हणजे कोसळणार अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

रंगराव काळे यांना विदर्भभूषण पुरस्काराने सन्मानित ; शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल….
Big Breaking ⚡ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त प्रशासकाची नियुक्ती
विधान परिषदेसाठी जिल्ह्यातून भाजपाच्या अनेकांची मोर्चेबांधणी ; मदन येरावार, ऍड निलय नाईक, उत्तमराव इंगळे, नितीन भुतडा गजानन महाराज माऊली महाकाली देवस्थान कासोळा यासह अनेकांचे नेत्यांना साकडे….
वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न….
हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”