माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “कारला मार्गे शेंबाळ पिंपरी या रस्त्यावर शेतकरी- शेतमजूर यांची जास्त येणे जाणे असून या रस्त्यावर अनेक गावी जोडली गेलेली आहे परंतु या रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट आहे त्यामुळे परिसरातील जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना, गर्भवती महिलांना, तसेच रोजच्या मजूर वर्गाला ये जा करण्यात फार अडचणी निर्माण होत आहे.
सदर परिसरात रस्त्याचे काम अती मंद गतीने होत आहे.
1) लोहरा फाटा ते सावरगाव रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे त्याची योग्य पळताळणी करून त्याला त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावे.
2) देवठाणा फाटा ते माणिकडोह या रस्त्याचे काम मागील 2 महिन्यांपासून संथ गतीने चालू आहे, सदर रस्ता हा वळणावळणाचा आहे त्यातही रस्त्यावर गिट्टी पसरवण्यात आली असल्याने वळणातुन गाड्याचा प्रवास अवघड होत असुन अपघात होत आहे याला जवाबदार कोण? राहणार
3) माणिकडोह गावाचा मुख्य रस्त्या मागील 3 महिन्या पासून खोदून ठेवला असुन मुख्य वरदळच बंद केली आहे, ST बस,ॲम्बुलन्स ये जा करण्याचा रस्ता बंद केल्याने बस गाड्या खंडाळा सावरगाव बंगला मार्गे जात आहे त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.
4) लाखी ते चिखली, पारवा ते पन्हाळा रस्त्याची दशा तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे
वरील रस्त्याची काम मंदगती व निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वरील कामाची त्वरित चौकशी करून बेजबाबदार कण्ट्रातदार व सबंधित अभियंत्यावर कार्यवाव्ही करण्यात यावी.सदर रस्त्याची रखडलेली काम त्वरित पूर्ण करावी अन्यथा पुसद काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी तालुका अध्यक्ष विलास वाघमारे शहर अध्यक्ष झिया शेख, प्रदेश अल्प. महासचिव सैय्यद ईश्तियाक , कार्यध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, नगरसेवक जब्बार लाखे, युवक जिल्हा सविव सुजित मानकामे, सेवादल अध्यक्ष गोपाल राठोड,युवक उपाध्यक्ष शाहीद मिर्झा, सूरज धुळे,गजानन इंगोले,यश चव्हाण,सुमेध कुलदीपके च्या स्वक्षऱ्या आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….