हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “महाराष्ट्र राज्य पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई अंतर्गत सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या अनुषंगाने ग्राम साधन व्यक्ती रवी माधव वाढई तसेच जिल्हा साधन व्यक्ती लक्ष्मण चव्हाण यांनी स्थानिक शाळेला भेट देऊन सविस्तर निरीक्षण केले.
या निरीक्षणादरम्यान शाळेतील विविध बाबींची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता, शालेय सुविधा, मध्यान्ह भोजन योजना तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी यांची तपासणी करण्यात आली. संबंधित कागदपत्रे, नोंदी व अहवालांची पडताळणी करून पारदर्शकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राम साधन व्यक्ती रवी माधव वाढई यांनी सांगितले की, सामाजिक अंकेक्षणामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक होते. तसेच जिल्हा साधन व्यक्ती लक्ष्मण चव्हाण यांनी शाळा व्यवस्थापनाला आवश्यक सूचना देऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

शाळा प्रशासनाने या निरीक्षणाचे स्वागत करत भविष्यात अधिक चांगल्या सुविधा व दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निरीक्षणामुळे शाळेतील कामकाज अधिक पारदर्शक व जबाबदार होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्या वेळीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.फारुक अहेमद , मुख्याध्यापक मोहम्मद शारिक सर, अब्दुल रब सर वहीदा बाजी मदतनीस मुस्कान सदफ व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सदस्य शे.एजाज ने.हुसेन व रहेमान चव्हान उपस्थित होते

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….