फडणवीसांच्या खासदारकींच्या मागणीवर संभाजीराजेचे मत काय..? म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं केली होती. यावर मराठा समाजाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
शिवसह्याद्री युथ फाऊंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
“फडणवीसांसाठी कोणी काही मागणी करत असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण फडणवीस हे मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत. ते एक चांगल नेतृत्व आहेत यामध्ये कुणाचंही दुमत नाही. त्यामुळं ते कोणा एका समाजाचे नेते असूच शकत नाहीत. ते सर्वच समाजेच प्रतिनिधीत्व करु शकतात,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
मराठा क्रांती ठोक मोर्चा आरक्षणासंदर्भात मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. यावरही संभाजीराजेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आबा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी असं काही करु नये, अशी माझी त्यांना एकच विनंती आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
दहिहंडीतील गोविंदांना खेळामध्ये ५ टक्के आरक्षणावर दिली प्रतिक्रिया
दहिहंडीतील गोविंदांना खेळामध्ये ५ टक्के आरक्षणावरही यावेळी संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दहिहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर ही चांगली बाब आहे. यासाठी त्यातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात ५ टक्के आरक्षण दिलं जात असेल तर ही चांगली गोष्ट आहे. पण गरीब मराठ्यांनाही आरक्षण मिळावं हे देखील सरकारनं त्यांनी लक्षात ठेवावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.