महागाव ठाणेदार अवैध धंदे आवरा नाहीतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ; तरुणांच्या हातात नंग्या तलवारी , शस्त्र , बंदुका सोशल मीडियावर ट्रेंड ; अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
महागाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हातात पेन ऐवजी तरुणांकडे नंग्या तलवारी , अवैध धारदार शस्त्रे , बंदुका दिसू लागल्या आहे. दादागिरी माजवण्यासाठी तरुण हीच शस्त्रे हातात घवून सोशल मीडियावर ट्रेंड होत धमाकुळ घालत आहे.महागाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील अद्यापही गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढतच चालले आहे.
महागाव तालुक्यात अवैध शस्त्रांचा मुक्तसंचार तर वाढलाच आहे.त्यासोबत गुटखा तस्करी , जुगार , मटका, अवैध दारू , गोवंश तस्करी , रोड रॉबरी , रेती तस्करी ,कडक गांजा सप्लायर ,अश्या विविध अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. रोड रोमिओंनी तर उच्छादच मांडला.महागाव पोलिसांच्या अकार्यक्षमतेने व्यापारी तर सुरक्षितच नाहीत .नुकतेच महागाव शहरातील संयमी व्यक्तिमत्त्व असलेल्या अनिल गंभिरमल शर्मा या किराणा व्यावसायिकास अट्टल गुन्हेगारी असलेल्या सोनेरी टोळक्यानी धारदार शस्त्राने गंभीर वार करून वसुलीची बॅग हिसकावून नेली.
जखमी व्यापाऱ्याल तात्काळ उपचारार्थ दाखल केल्याने देव बलवत्तर त्यांचा जीव वाचला. तत्पूर्वी तालुक्यात कमी दिवसात लखपती होण्याच्या नादात फुलसावंगी येथे तरुणांनी मायक्रो फायनान्स च्या कर्मचाऱ्याला लुटण्यात आले. सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याला पुसद रोडवर गंडविण्यात आले. खडका वाघनाथ येथील पेट्रोल पंपावर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. बनावट नायब तहसीलदाराने सराफा लाइन मधील दुकानातील सोने लंपास केले.यातील काही प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना बेड्या ठोकल्या.मात्र सोन्याच्या व्यापाऱ्यावर घडलेल्या प्रसंगाचा अद्यापही छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
ज्या काही घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले तर म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रामाणिक प्रयत्न. जे एलसिबी करू शकते ते स्थानिक पोलीस का नाही करू शकत. दुचाकी चोरीच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सवना येथील ट्रॅक्टर चोरी प्रकरणात फिर्यदिनेच आरोपीचा शोध लावला.माहिती पोलिसांना दिली.त्यावरून सहआरोपी पोलिसांनी डिटेक्ट केला मात्र मुख्य आरोपीचा अद्यापही शोध लावला नाही.ही शोकांतिका आहे. मुख्य आरोपीचा शोध लावला असता तर अनेक गंभीर गून्हाचा उलगडा होऊ शकला असता मात्र पोलिसांना ते जमत का नाही हे कोडेच.
तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या तक्रारी बेदखल करण्यात येत आहे. पोक्सो अंतर्गत आरोपींना पोलिसांनी पाठीशी घातले. पोक्सोतील एका आरोपीची अटक टाळण्यासाठी ठाण्यातील एकाने ८० हजारांनी लुबडल्याची घटना ताजी आहे. अंबोड्यातील आपसी वादातील गुन्हा बर्किंग करण्यासाठी हजारोंचा बाजरा घेतल्या गेला. अश्या विविध घटनांची चौकशी करण्याचे आव्हान जिल्हा पोलिस प्रशासनासमोर आहे.पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याने तरुण वाम मार्गाकडे वळू लागला. कमी दिवसात जास्त कमाई होण्याचे साधन असलेल्या अवैध दारू च्या व्यवसायात तरुण पिढी आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्याशी मधुर संबंध असल्याने अशिक्षित अवैध दारू व्यवसायीकांची दादागिरी वाढली आहे.
किरकोळ वाद जरी उद्भवला तर तलावर आणि बंदूक सारखे शस्त्र बाहेर निघू लागले आहे.एवढ्या गंभीर प्रकारावर पोलिसांचे नियत्रंण नसल्याने एक दिवस रक्तरंजित दिवस उजाडल्या शिवाय राहणार नाही.
दोन तीन दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ४ ठिकाणी धाडी टाकून अवैध दारू साठा जप्त केला.त्यातूनच स्थानिक पोलिसांची कार्यप्रणाली स्पष्ट होते. मात्र कार्यवाहीच्या नावाखाली पोलीस दलातील अपवाद वगळता शुक्राचार्य लक्ष्मी दर्शनाला प्राधान्य देत आहेत.
पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि अवैध व्यवसायाकडे लक्ष देत त्यांच्या नांग्या आवळल्या तर त्यांची अवैध शस्त्र बाळगण्याची हिंमतच होणार नाही.त्यामुळे ठानेदाराने अवैध धंदे आवरावे नाहीतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी हाक महागाव तालुका वासियानी दिली आहे. अन्यथा आता जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही हे मात्र खरे.