माजी आमदाराच्या गावात विजेचा खेळखंडोबा ; महिन्याभरापासून नागरिक अंधारात ; ग्रामस्थ उपविभागीय कार्यालयावर धडकले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
महिन्याभरापासून अधिकाऱ्यांना सूचना देवूनही अधिकारी दखल घेत नसल्याने माजी आमदाराच्या कलगाव गावातील संपातलेल्या नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या उपविभागीय कार्यालय धडक दिली. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महागाव ते कलगाव स्वत्रंत वीजजोडणी अंतिम टप्प्यात : माजी आमदार नजरधने
महागाव ते कलगाव वीज जोडणी करिता मी दस्तुरखुद्द कार्यकारी अभियंत्याच्या दालनात बसून इस्टिमेट करून घेतले.काम मंजूर झाले.आणि काम सध्या प्रगतीपथावर आहे.काही राजकीय अडथळे निर्माण झाले होते.त्याची समजूत काढून काम पुन्हा सुरू करण्यात आले.सध्या काम अंतिम टप्प्यात आहे.लवकर स्वतंत्र वीज जोडणी चे काम पूर्ण होईल आणि माझ्या गावातील विजेचा प्रश्न कायम मिटणार आहे.अशी माहिती माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी बोलताना दिली आहे.
उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे महागाव तालुक्यातील कलगाव हे गाव आहे. कलगाव गावातील वार्ड १ मधील महिन्याभरापासून नागरिक अंधारात आहेत.याबाबत संबंधित अधिकारी यांना तोंडी सूचना देवून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत कळविण्यात आले.मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सूचनेकडे महिन्याभरापासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. विजेचा प्रश्न कायम असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे तरीही अधिकारी लक्ष देत नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी महावितरण उपविभागीय कार्यालयावर धडक देत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी गावातील लिंबाजी वानखेडे , तातेराव सरदार ,पंजाब सरदार,अरुण राऊत,बळीराम नजरधने,अक्षय रणमले,रमेश आगरकर,अशोक राऊत,अक्षय नजरधने, दत्ता मोरे,संतोष राऊत यावेळी उपस्थित होते.
येत्या आठवड्यात कलगाव येथील वीज पुरवठा सुरळीत करू,आता पर्यंत पाच ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दिले आहेत.नागरिकांनी शेगडीचा वापर टाळावा,जास्त लोड वाढत असल्याचे समस्या निर्माण होत आहेत.
विनोद चव्हाण,उप कार्यकारी अभियंता महागाव

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….