फडणवीस खोट बोलत आहे , त्यांना पाणी योजना पक्ष्यांच्या उद्योगपती खासदाराला द्यायची होती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- शहाराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना-भाजप या सर्वाधिक काळ महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. (Bjp) राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादात उडी घेत महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मी दिलेली १६०० कोटींची योजना रद्द झाल्याचा आरोप केला आहे.
मुंबईत पाणी प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
याचाच दाखला देत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ते खोटं बोलत असल्याचा दावा ट्विटच्या माध्यमातून केला आहे. (Aurangabad) फडणवीस यांच्या पक्षाच्या राज्य सभेतील एका उद्योगपती खासदाराला स्वार्थासाठी माझ्या शहराचे पाणी द्यायचे होते, असा आरोप इम्तियाज यांनी केला आहे.

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. विशेष म्हणजे शिवसेने सोबत तीन दशके महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजपने मनसेला सोबत घेत तो पेटवला आहे. पाणी प्रश्न हा औरंगाबादकारंच्या जीवन मरणाचा प्रश्न निश्चितच आहे, परंतु राजकारणी मात्र यावरून गेली अनेक वर्ष राजकारणच करत आले आहेत.
औरंगाबादेतील आंदोलनावरून फडणवीस यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मी शहरासाठी सोळाशे कोटींची योजना दिली होती, पण नाकर्त्या आघाडी सरकारने ती रद्द केली, असे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या माथी खापर फोडले. याला एमआयएमने उत्तर देत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष औरंगाबादकरांच्या पाणी प्रश्नाला जबादार असल्याचे म्हटले आहे.
फडणवीसांच्या आरोपाचा हवाला देत केलेल्या ट्विटमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी संमातर या जुन्या पाणी योजनेचा संदर्भ देत म्हटले आहे की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी फडणवीस यांना माझ्या शहराचे पाणी हे त्यांच्या पक्षाच्या राज्यसभेतील उद्योगपती खासदाराला द्यायचे होते. त्यामुळे शिवसेना-भाजप हे दोन पक्षच पाणी प्रश्नाला जबाबदार आहेत, असे इम्तियाज जलील यांनी अधोरेखित केले आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….