‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अंतर्गत 24 एप्रिल ते 1 मे कालावधीत किसान क्रेडिट कार्ड वाटप मोहीम…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 21 एप्रिल, :- “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अंतर्गत जिल्ह्यात प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यासाठी 24 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी आज सर्व बँकर्स व कृषी अधिकाऱ्यांना दिले.
केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक यांचे समन्वयाने सदरची मोहिम राबविण्यात येणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी हे यासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.
मोहिम कालावधीत संबंधित बँकांनी किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन 1 मे 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करणेची कार्यवाही पुर्ण करण्याबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्याचे जिल्हा व्यवस्थापक व कृषी विभागाच्या समन्वयाने 26 एप्रिल रोजी गावनिहाय पीकविमा पाठशाळाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी यावेळी सांगितले.
बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधीकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, नाबार्डचे व्यवस्थापक दीपक पेंदाम, विविध बँकेच प्रतिनिधी तसेच संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…