विशेष मोहिमेंतर्गत मार्चअखेर जात पडताळणीची 2744 प्रकरणे निकाली ; जात वैधता प्रमाणपत्र विषयावर 22 व 23 एप्रिल रोजी आकाशवाणीवर मुलाखत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 21 एप्रिल, :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी विशेष मोहिमेंतर्गत माहे मार्च-2022 अखेर पर्यंत प्राप्त सर्वच प्रकरणे तपासून एकूण 2744 प्रकरणाचा निपटारा केला आहे.
निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये शैक्षणिक-2480, सेवा-81, निवडणूक-182 व इतर-1 अशी एकूण 2744 जात पडताणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.
ज्या अर्जदारांनी समितीकडे प्रकरणे सादर केलेली आहे, त्या सर्व अर्जदारांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अर्जात नमूद ई-मेल वरून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. प्रमाणपत्र बारकोड आधारीत डिजीटल स्वाक्षरीने निर्गमीत केले असल्यामुळे ते मुळ प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नेण्याकरिता समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांची जात वैधता प्रमाणपत्र बाबत माहितीपर मुलाखत 22 व 23 एप्रिल 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता यवतमाळ आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांनी केले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..