मुंबई मनपा निवडणुका समोर ठेवून भाजप कडून धर्माचे राजकारण सुरू :- रोहित पवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणाचे राजकारण ज्या भाजपच्या नेत्याने केले, त्या नेत्याने राज्यात भाजपची सत्ता असताना चौंडी व सांगली येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी निधी का आणला नाही?’
असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. दरम्यान, भाजपकडून मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून धर्माचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी केला.
आमदार पवार यांनी सांगली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, नगरसेवक मनोज सरगर, अमित शिंदे आदी उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले, ‘महापालिकेच्या वतीने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सर्वपक्षीय धनगर समाजाच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र, त्यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी दबाव आणून राजकारण केले. ज्या नेत्याने याला विरोध केला होता, त्या नेत्याने चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक व सांगलीतील होळकर स्मारकासाठी निधी का दिला नाही? शिवाय आरेवाडी येथील बिरोबा मंदिराला स्व. आर. आर. पाटील यांनी मोठा निधी दिला. भाजपच्या सत्ताकाळात निधी मिळाला नाही. त्यावर ते गप्प का राहिले?’ असे सवाल रोहित पवार यांनी केले.
‘मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच यात्रा काढत आहे. त्यांची दुटप्पी भूमिका आहे. सांगलीत महापूर आला त्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार होते. पुराकडे दुर्लक्ष केले. कर्नाटकात त्यांची सत्ता असताना त्यांचा संवाद झाला नाही. गतवर्षी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकात जाऊन पाण्याच्या विसर्गाबाबत चर्चा केली. पुराचे नियोजन केले. पूर ओसरल्यानंतर सात महिन्यांनी केंद्राचे पथक आले. सांगलीला भरपाई मिळाली नाही; पण गुजरातमध्ये धोका होण्याच्या अगोदर हजारो कोटींचे पॅकेज मिळाले. महाराष्ट्राबाबत पंतप्रधान दुजाभाव करीत आहेत,’ असा आरोप आमदार पवार यांनी केला.
राज ठाकरेंची भाषा आता बदलली
‘राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाषणांत युवकांचे मुद्दे होते. पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात ते बोलत होते. मात्र, आता त्यांची भाषा बदलली आहे. भाजपचे म्हणणे ते मांडत आहेत,’ असेही पवार म्हणाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..