महेंद्र महाराजावर हल्ला ; संभाजी ब्रिगेडच्या २५ जणांवर गुन्हा दाखल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगाेली :- हिंगोलीत हटकर धनगर समाजाचे राज्यस्तरीय नेते व प्रख्यात प्रवचनकार महेंद्र महाराज म्हस्के यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अखेर संभाजी ब्रिगेडच्या २५ कार्यकर्त्यांवर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्र महाराज म्हस्के यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात हटकर धनगर समाजासह ओबीसी समाज आक्रमक झाला होता.
शासकीय विश्रामगृहात शेकडो कार्यकर्ते जमले हाेते. मस्के महाराजांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आक्रमक झाले होते. राज्यभरात वारकरी सांप्रदायाने देखील याबाबत कठोर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कळमनुरी पोलिसांनी महेंद्र महाराज म्हस्के यांची तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलिसांची वेगवेगळी पथके देखील संशयितांच्या अटकेसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली. कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पाेलीसांनी व्यक्त केला.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…