भाजप नेत्यांविरोधात केलेले “ते” वक्तव्य राऊतांना महागात पडणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना एयएनएस विक्रांत प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती.
त्याच पार्श्वभूमीवर आता बार काऊन्सीलने राऊत यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केलीय. विशेष म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही नावं आहेत.
इंडियन बार असोसिएशनने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबतच इतरांविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. “उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींविरोधात खोटे, (प्रतिष्ठेला) कलंक लावणारे आणि अवमानजनक आरोप केल्याप्रकरणी” ही याचिका दाखल करण्यात आल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. अर्जदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा याचिकेमध्ये प्रतिसादकर्ते म्हणून उल्लेख केलाय.

राऊत काय म्हणालेले?
एखाद्या विशिष्ट पक्षाच्या आणि विचारसणीच्या लोकांना न्यायालयाकडून रांगेत दिलासे कसे मिळतात असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्यांना मिळालेल्या दिलाश्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना राऊत यांनी भाजपाच्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा कसा काय मिळतो, यासाठी न्यायव्यवस्थेमध्ये काही विशिष्ट लोक बसवली आहेत का?, असे प्रश्न उपस्थित केले होते.
संजय राऊत यांना पत्रकारांनी १५ एप्रिल रोजी संवाद साधताना सोमय्यांसंदर्भात प्रश्न विचारला होता. सोमय्यांना दिलासा मिळाल्यानंतर तुम्ही “दिलासा घोटाळा आहे” असं ट्विट केल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, “मी १०० टक्के सांगतो हा दिलासा घोटाळाच आहे. तो विशिष्ट राजकीय पक्षाच्या आणि विशिष्ट विचारांच्या लोकांनाच मिळावा यासाठी न्याययंत्रणेमध्ये एक व्यवस्था काम करतेय,” असं उत्तर दिलं होतं.
पुढे बोलताना राऊत यांनी, “मी आताच महाराष्ट्रातले एक आमदार जे फडणवीसांचे उजवा हात म्हणून ओळखले जातात त्या संजय कुटे यांची एक जळगावची बातमी वाचत होतो. काल ते एका ठिकाणी असं बोलले की, ज्या गोष्टी आम्ही पोलीस आणि प्रशासनाकडून करुन घेऊ शकत नाही त्या आम्ही न्यायालयाकडून करुन घेत असतो. न्यायालयात आमचं वजन आहे. आता हे कोणत्या प्रकारचं वजन आहे हे काल परवा आपल्याला दिसलं असेल,” असा टोलाही लगावला.
“गेल्या काही काळापासून सतत काही लोकांना जे दिलासे मिळतायत भाजपाच्या लोकांना, अगदी दिशा सॅलिअन प्रकरणापासून मुंबै बँक प्रकरणापर्यंत ते आयएनएस विक्रांतच्या निधीचा घोटाळ करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सगळ्यांना दिलासे कसे मिळतात?,” असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.
तसेच पुढे त्यांनी, “न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाव आहे का? न्यायव्यवस्थेमध्ये विशेष अशी लोक बसवण्यात आलेली आहेत का? दिलासे देण्यासाठी ते कोणाच्या सूचनेनुसार काम करतायत का?,” असेही प्रश्न उपस्थित केले. त्याप्रमाणे, “हे असच सुरु राहिलं तर या देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल,” असंही राऊत म्हणाले.

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….
‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..