भिम जयंतीला मद्य विक्री बंद…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- वंचित बहूजन युवा आघाडीच्या पुढाकाराने भिमजयंती संदर्भात नियोजन भवनात आयोजित सभेमध्ये पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे, गजानन गवई यांनी परवानगी, मिरवणूक बाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती.
त्यातच गुरुवार, ता. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ता. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये गुरुवारी (ता. १४) कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित केले.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे वंचित बहुजन युवा आघाडीने स्वागत केले आहे. जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..