धनंजय मुंडे वर ब्रीच कँड रुग्णालयात उपचार सुरु ; पंकजा सह प्रितम मुंडे ही भेटीला हजर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ब्रीच कँड रुग्णालयात उपचार (Dhananjay Munde Health) सुरू आहेत. आज अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली.
त्यानंतर भावाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja) आणि खासदार प्रितम मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या आहेत.
धनंजय मुंडेंना मंगळवारी सकाळपासून अस्वस्थ वाटत होते. धनंजय मुंडे हे सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर होते. तिथेच सायंकाळच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती आहे. सध्या धनंजय मुंडेंवर उपचार सुरू आहेत. काल रात्री राजेश टोपे स्वतः रुग्णालयात हजर होते. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली असून धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.
या नेत्यांनी घेतली भेट –
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज सकाळीच धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. धनंजय मुंडेंना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवायला सांगितलं आहे. आज दुपारी त्यांना विशेष खोलीत हलविण्यात येणार आहे. आज काही चाचण्या करण्यात येणार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच मुंडेंचा मराठवाड्यात दौरा होता. त्यामुळे ते खपू थकले होते. थकव्यामुळे त्यांना चक्कर आली होती. सध्या काळजी करण्याचं काहीही कारण नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यानंतर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुंडेंची भेट घेतली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..