चौकशीसाठी हजर व्हा नाहीतर फरार घोषित करू , सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे, ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या बेपत्ता आहेत. दरम्यान या प्रकरणात आता आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या घरावर धडक देऊन, त्यांना आज सकाळी आकरापर्यंत चौकशीस हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. अडचणीत वाढ म्हणजे मंगळवारीच त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दरम्यान यापूर्वी देखील सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले होते. पण ते हजर झाले नाहीत. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत तर त्यांना फरार घोषित केले जाईल अशी माहित पोलिसांनी दिली आहे.
…तर फरार घोषित करू
‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्यांवर आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या हे बेपत्ता आहेत. दरम्यान आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने काल सोमय्या यांच्या घरी जाऊन त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिटकवली आहे. या नोटीसीमध्ये आज सकाळी अकरापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील सोमय्या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स दिले होते. पण ते हजर झाले नाहीत. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत तर त्यांना फरार घोषित केले जाईल, असं पोलिसांनी म्हटले आहे.
भाजपला सहआरोपी करा – पटोले
दरम्यान या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणात भाजपला सहआरोपी करा अशी मागणी केली आहे. ते याबाबत बोलताना म्हणाले की, ‘सोमय्यांनी ‘विक्रांत बचाव’ मोहिमेतील निधी पक्षाला दिल्याचे सांगितले ही जर गोष्ट खरी असेल तर तो देखील गुन्हा ठरतो, त्यामुळे या प्रकरणात भाजपाला देखील सहआरोपी केले गेले पाहिजे.’ या प्रकरणात तत्कालील प्रदेशाध्यक्ष आणि खजीनदारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….