राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा निशाणा , म्हणाले , त्यांना गांभीर्याने घेऊ नका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी आज उत्तर दिलं आहे.शरद पवार यांनी म्हटलं की, राज ठाकरेंच्या वक्तव्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
मला सकाळी लवकर उठावं लागतं. फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो असा आरोप केला जातो. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होता. तेव्हाही होता आणि आता ही विरोध आहे. जेम्स लेनचं लिखाण गलिच्छ होतं. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती, असं पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख किंचीतही नाही. भाषणात सर्वसामान्यांचा उल्लेख नव्हता. राष्ट्रवादी हा संपवणारा पक्ष असा त्यांनी उल्लेख केला मात्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची दखल घेतली, असं पवार म्हणाले.
ते म्हणाले की, भाषणात त्यांनी सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत, असं ते म्हणाले. पवार म्हणाले की, राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले.
शरद पवारांसंदर्भात काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत शरद पवारांवर आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे. महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..