गुणवंत सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपणार , जेल की बेल…? आजच्या सुनामी कडे लक्ष…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांन भडकावत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलन करणाऱ्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी वकील गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी झाली आहे. त्यांची आज पोलीस कोठडी आज संपत आहे. गुणरत्न सदावर्ते आणि इतर आठ जणांना आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील त्यामुळं आजच्या सुनावणीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, जरी आज सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांचा ताबा मिळवण्यासाठी सातारा पोलीसही प्रयत्न करणार असल्याचं कळत आहे. सातारा पोलीस आज सुनावणीवेळी वॉरंट घेऊनच न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज न्यायालयात काय घडतं हे पाहावं लागेल. ११ तारखेच्या सुनावणीत सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वकील सदावर्तेंवर दोन वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला आहे. आंदोलकांची माथी भडकावणे तसेच चिथावणीखोर भाषण देणे याबाबत त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तसेच राज्यातील सातारा व मुंबईत असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळं आज न्यायालयात काय सुनावणी होते याकडे लक्ष लागले आहे.

कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा लढवय्या हरपला, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन….
स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ‘ओपन’मधून संधी नाही; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय….