गृह विभागाच्या अपयशाची चर्चा अन् मुख्यमंत्री ठाकरे अँक्शन मोडवर ; पोलीस आयुक्त थेट “वर्षा” वर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एस.टी. कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत काल (ता.8) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता.
यावरून गृह विभागाच्या अपयशाचा मुद्दा सर्वपक्षीय नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या हाती सूत्रे घेतली आहेत. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना तातडीनं बोलावून घेतलं.
गृह विभागाबाबत एवढा गदारोळ सुरू झाल्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ठाकरेंनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवासस्थानी तातडीनं बोलावून घेतलं आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांकडून पांडे यांची झाडाझडती घेण्यात आल्याचे समजते. याचवेळी गृहमंत्र्यांऐवजी थेट मुख्यमंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांनी बोलावून घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पवारांच्या घरावरील हा हल्ला म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सर्वपक्षीय नेत्यांकडून पोलीस काय करत होते? पोलिस कमी पडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलीस कमी पडल्याची कबुली देत आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हल्ल्यामागचा सूत्रधार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत. कारण माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही? हा प्रश्न आहे.
राऊतांचाही गृह विभागाला दोष
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वी कारवाई का केली नाही? ते सहा महिन्यांपासून बोलत आहेत. यावर बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहविभाग आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या आहे. राऊत म्हणाले की, सहा महिन्यांनंतर कारवाई केली कारण संयमाचा कडेलोट झाला. पण आम्ही नेहमी सांगतो, इतका संयम बरा नाही. इतकी सहिष्णुता बरी नाही. कायद्याने अनेकदा अशा बाबतींमध्ये. कठोर व्हायला हवे. इतके गुळगुळीत, बुळबुळीत आणु बुळचट सत्ताकारण चालत नाही.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….