भाजप कडूनच मराठा समाजाची फसवणूक :- अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- आरक्षणाची पन्नास टक्याची अट आहे. हे माहित असतानाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले.
ते न्यायालयात टिकले नाही. यामुळे मराठा समाजाची खऱ्या अर्थाने फसवणूक भाजपनेच केली आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण केला. कोल्हापुरात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर हा गंभीर आरोप केला.
ते म्हणाले, केंद्र सरकार आरक्षणाची पन्नास टक्याची अट शिथील करू शकते. पण केंद्रातील भाजपला हे करायचे नाही. अट शिथील करण्यासंबंधी आवाज उठवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करीत होते. त्यांना संसदेत बोलू दिले नाही. यामुळे भाजपच मराठा आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे.
खोटं बोल पण रेटून बोल
या प्रश्नावर सातत्याने ते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करीत आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा पध्दतीचे त्यांचे आरोप आहेत. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला जाास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका घेतली आहे. सारथीला निधी देण्यात येत आहे. वस्तीगृह सुरू केले जात आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज घेतलेल्यांना व्याज परतावा दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..