धक्कादायक ; धुळ्यात 69 प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
धुळे :- धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील धक्कादायक घटना रात्री उघडकीस आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर अचानक प्रशिक्षक पोलीस (Police) जवानांना उलट्या, मळमळ व जुलाब चालू झाले.
जवळपास 69 प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा (Food Poison) झाल्याचे उघडकीस आले आहे.
तात्काळ या सर्व बाधित प्रशिक्षणार्थी पोलीस जवानांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. बाधित झालेल्या या 69 पोलीस जवानांपैकी 29 पोलीस जवानांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाकी 40 पोलीस जवानांना प्राथमिक उपचारानंतर बरे वाटू लागल्याने त्यांना पुन्हा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पाठवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत बाधित पोलीस जवानांची पाहणी केली व त्यांची विचारपूस देखील केली आहे. या संदर्भातील संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस जवानांना विषबाधा कशातून झाली याचा तपास धुळे शहर पोलिसांतर्फे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच या संदर्भातील उलगडा होईल असे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….