नाराजी नाट्यानंतर राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे नेत्यांना मुंबईत बोलावलं पण वसंत मोरेंना……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुणे मनसेतील नाराजी नाट्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांना आज मुंबईत बोलावलं आहे.
यामध्ये मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. परंतु राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याच जाहीरपणे सांगणाऱ्या शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र मुंबईला बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
काय म्हणाले होते वसंत मोरे?
मनसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर म्हटलं होतं की, माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही. सोबतच राज ठाकरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली. परंतु, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही. याचा अर्थ मी राज ठाकरे किंवा पक्षावर नाराज आहे, असा मुळीच नाही, असेही वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यासमोर डबल आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याचं दिसून आलं. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….