वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाला नेतृत्व देण्यासाठी महिला सक्षम व्हाव्या :- जिल्हाधिकारी अमोल येडगे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 15 मार्च, :- महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजाला नेतृत्व देण्यासाठी महिला तयार झाल्या पाहिजे, त्यासाठी प्रशासनाकडून नेहमीच सहकार्य दिल्या जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल विकास विभागाच्या सखी वनस्टॉप सेंटर द्वारे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे बोलत होते. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी सविता चौधर, स्नेहल कनिचे, जिल्हा कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, आशा वर्कर उषा भुरके, महानंदा टोम्पे, सरिता अभयनिता, श्रीमती भगत, लीलाबाई खंडारे, धनश्री देशमुख, वन स्टॉप सेंटर च्या मिनल जगताप, सोनाली पाटील त्यांची चमू तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेंद्र राजुरकर व चमु व महिला व बालविकास विभागाचे गजानन जुमळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विविध विभागाच्या महिला प्रतिनिधी, विद्यार्थीनी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….