विशेष मोहिमेंतर्गत फेब्रुवारीमध्ये जात पडताळणीची 2242 प्रकरणे निकाली नोव्हेंबर-2021 पर्यंतची जात प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 15 मार्च, :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी विशेष मोहिमेंतर्गत माहे नोव्हेंबर-2021 पर्यंत प्राप्त सर्वच प्रकरणे तपासून माहे फेब्रुवारी-2022 मध्ये एकूण 2242 प्रकरणाचा निपटारा केला आहे.
निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये शैक्षणिक-1974, सेवा-81, निवडणूक-184 व इतर-3 अशी एकूण 2242 जात पडताणीची प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.
ज्या अर्जदारांनी समितीकडे माहे नोव्हेंबर-2021 पर्यंत प्रकरणे सादर केलेली आहे, त्या सर्व अर्जदारांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच अर्जात नमूद ई-मेल वरून आपले जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. प्रमाणपत्र बारकोड आधारीत डिजीटल स्वाक्षरीने निर्गमीत केले असल्यामुळे ते मुळ प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नेण्याकरिता समितीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
समितीमार्फत पुढील प्रकरणे निकाली काढण्याचे काम प्रगतीपथावर असून प्रलंबित प्रकरणात अर्जदारांना ई-मेल व भ्रमणध्वणीवर संगणक प्रणालीमार्फत त्रुटीचा संदेश पाठविण्यात आला आहे. सदर त्रुटीची पुर्तता त्वरीत पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांनी केले आहे.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…