आता राष्ट्रवादी IT च्या रडारवर ; 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन ; अजित पवारांच्या 3 बहिणीच्या कंपनी छापे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 09 मार्च :- शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस IT च्या रडारवर आहे. महाराष्ट्रात 40 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.
यात 25 निवासस्थानं आणि कार्यालयं आहेत. काही पंचतारांकित हॉटेल्समध्ये आयकर अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बंगळुरूमध्येही सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा टाकण्यात आला आहे.
यात त्यांच्या 3 बहिणींशी संबंधीत कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे.
याआधी आयकर खात्याने मुंबईत 5 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत (Income Tax Department Raid). पहाटे 5 वाजल्यापासून हे सर्च ऑपरेशन सुरू आहे. यात परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parb) यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली.
सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं. तसंच राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभाग छापे टाकले आहे. Goa Election: घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसचा सावध पवित्रा; घेतला मोठा निर्णय पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. संजय मानजी कदम हे शिवसेना पदाधिकारी आहेत. त्यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. अंधेरीच्या कैलास नगरमधील स्वान लेक कैलास या इमारतीतील 16 व्या मजल्यावर संजय कदम यांचं घर आहे. संजय कदम अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..