पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधीचं राऊतांना पत्र , म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापलंय. एकीकडे अधिवेशात गौप्यस्फोटांची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाच्या छापासत्रांनी महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांना जेरीस आणलंय.
यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय संघटनांवर मोठे आरोप केले आहेत. (Sanjay Raut Slams IT over raids in Maharashtra)
देशात ईडीनंतर आयकर विभागाची भानामती सुरू असल्याचा घाणाघात त्यांनी केला. राऊत यांच्या पत्रकार परिषदेआधीच सकाळी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्या निकटवकर्तीयांवर छापे पडले आणि घडामोडींना वेग आला. पत्रकार परिषदेत राऊत यांनी भाजपवर आरोप केले. यानंतर आता राहुल गांधी यांनी राऊतांना पत्र लिहून मी तुमच्या पाठिशी असल्याचं सांगितलंय.
ईडी म्हणजे भाजपची एटीएम मशीन असून, ईडीने आतापर्यंत सर्वात जास्त धाडी महाराष्ट्रात टाकल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना पत्र पाठवलंय. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी उभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय तपास यंत्रणा टार्गेट करत आहेत. यातून मोदी सरकार विरोधकांना गप्प करत असल्याचं स्पष्ट झालंय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.
काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी असून कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही. काँग्रेसच्या वतीने मी तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दर्शवत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
हे पत्र संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलंय. लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आपल्याला एकत्र लढावं लागेल. केंद्रीय तपास यंत्रणा एका पक्षाच्या गुलामाप्रमाणे वागत आहेत. आणि हे हे फक्त दुर्दैवी नाही तर धोकादायकही आहे, असं ते म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….