विरुद्ध दिशेने वाहने चालविणे आता पडणार महागात ; थेट गुन्हे दाखल होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी देताच, सोमवारी पहिल्या दिवशीच ३५ गुन्हे नोंदवण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे हे दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून आठवड्याच्या कामांची माहिती देणार आहेत. विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. त्यानुसार सोमवारी कारवाईचा वेग वाढला आहे.
यादरम्यान विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या विरोधात ३५ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये वन वे कारवाई (५६४), पार्किंग नियम उल्लंघन (२०४७), सीट बेल्टचा वापर न करणे (६५८), विनाहेल्मेट (२८६४), बेवारस वाहने उचलणे (२२६) तसेच विना परमिट वाहन चालविल्याप्रकरणी ७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….