पुणे पालिकेत येणारे पंतप्रधान नेहरू नंतर मोदी येणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पानशेत धरण फुटले मुठा नदीला आलेल्या पुराने पुण्याची वाताहात झाली. पुणेकरांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यात आले होते.
पानशेत धरण (Panshet Dam) फुटले (Damage) मुठा नदीला आलेल्या पुराने (Flood) पुण्याची (Pune) वाताहात झाली.
पुणेकरांचे सांत्वन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या सभागृहातून पुरस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तब्बल ६१ वर्षांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या रूपाने देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये येत असून, त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्च रोजी पुणे दौऱ्यावर असल्याने महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन व पोलिसांकडून तयारी सुरू झाली आहे. महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे अनावरण मोदी यांच्या हस्ते होणार असून, अवघ्या १० ते १५ मिनिटांचा हा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर मोदी हे ‘मेट्रो’चे उद्घाटन आणि प्रकल्पांच्या भूमिपुजनासाठी कोथरूड येथे जाणार आहेत.
पंतप्रधान मोदी पुणे महापालिकेत येणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने त्यानिमित्ताने १९६१ सालची पंडित नेहरूंच्या पुणे भेटीची आठवणही ताजी झाली आहे. नेहरू पंतप्रधान असताना ते पुण्यात आले होते व महापालिकेच्या सभागृहात त्यांनी आढावा घेतल्याचे छायाचित्र सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे पंडित नेहरू यांच्यानंतर पुणे महापालिकेत येणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. त्यावरूनही राजकीय चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, ”पंडित नेहरू महापालिकेत आले तेव्हा त्यांच्यासोबत व्यासपीठावर महापौर रोहिदास किराड, राज्यपाल सी. प्रकाश, महापौरांची पत्नी छगनबाई किराड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब खेडकर उपस्थित होते.
‘पानशेत पुर आला त्यावेळी माझे काका रोहिदास किराड पुण्याचे महापौर होते. या पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नेहरू पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पुणे महापालिकेतील सभागृहात उपस्थित राहून पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी उघड्या जीपमधून प्रवास करून पूरस्थितीची पाहणी केली होती.’
– वीरेंद्र किराड, माजी नगरसेवक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….