गेल्या 24 तासात दोन पाॅझिटीव्ह ; सात कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1764 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 29
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 1 मार्च, :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 23 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 29 झाली आहे. त्यातील 1 रूग्ण रूग्णालयात तर 28 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 744 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 742 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79058 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77226 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.
आज पाॅझिटीव्ह आलेल्या दोन रूग्णांत पांढरकवडा व यवतमाळ येथील प्रत्येकी एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 44 हजार 509 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 65 हजार 451 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.36 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.27 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1764 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1764 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 2 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 785 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.