अजित पवारांनी पंतप्रधानांची केली स्तुती ; म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाकामांच्या माध्यमातून लोकांचे मन जिंकले”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्याचेमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली आहे.
शनिवारी आढावा बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे अजित पवारांनी कौतुक केलं आहे. मोदींचे कौतुक करताना, जे लोक विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता मत देते, असं पवार म्हणाले.
‘पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते. वादांमध्ये रस असणारे फार थोडे लोक आहेत,” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील मुख्ये मुद्दे–
-पुणे जिल्ह्यात ५१ टक्के कोरोना घट
– पुण्याचा कोरोना दर ४.४ टक्के झाला आहे.
– पूर्व प्राथमिक शाळा २ मार्चपासून सुरू होणार, सर्व नियमाचा पालन करून शाळा सुरू होणार. पालकांना वाटलं तर त्यांनी मुलं शाळेत पाठवावीत.
– लसीकरण जास्तीत जास्त करणं सुरू आहे
– १ मार्चपासून जम्बो हॉस्पिटल बंद होणार. पुणे महापौर यांच्याशी बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टर यांच्याशी बोलून अन रुग्ण संख्या पाहता आता गरज वाटत नाही म्हणून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
– विभागीय आयुक्तांनी सागितले की पंतप्रधान मोदी याचा दौरा आहे. मी पालकमंत्री म्हणून असेल मुख्यमंत्री त्यांच्या तब्येतमुळे तेच निर्णय घेतील.
– राज्यातील कोरोना नियम शिथिलता बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील.सध्या कोरोना आकडेवारी घट होत आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….