नवाब मलिक यांच्या मुलालाही ईडीचे समन्स…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकाणामध्ये सध्या ईडीचे धाडसत्र सुरु आहे. गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पहाटे सहा वाजताच ईडीने धाड टाकली होती.
त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि सरतेशेवटी आठ तासांच्या चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आता एक मोठी घडामोड समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या मुलाला देखील ईडीने समन्स पाठवले आहेत.
नवाब मलिक यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!