राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. समर्थ रामदासां विना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी विचारेल असतं, अशा आशयाचे विधान त्यांनी केले आहे.
या विधानामुळे राज्यपाल कोश्यारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेत श्री समर्थ साहित्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेला संबोधताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, चाणक्या विणा चंद्रगुप्तला कोणी विचारलं असतं, समर्थ रामदासांविना शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानानंतर कोश्यारी यांनी मी छत्रपती शिवाजी आणि चंद्रगुप्तला छोट लेखत नसल्याचीही सारवासारव केली होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले आहेत की, प्रत्येकामागे त्यांच्या त्यांच्या आई-बाबाचे योगदान आहे. तसेच आपल्या समाजात गूरूंचे मोठे योगदान आहे. तसेच चाणक्य आणि समर्थ रामदास यांचे होते. आजच्या युगात गूरू नाहीत तर गुरूघंटाळ आहेत, असेही ते म्हणाले आहेत.आणि मराठी साहित्यात संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी मोठे योगदान दिले असल्याचे कोश्यारी यांनी सांगितले.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….