स्फोटांमध्ये दोन जण ठार ; मणिपुरमध्ये मतदानापूर्वी हिंसाचारांची मालिका सुरूच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चुराचंदपूर :- सध्या देशात पाच राज्याच्या निवडणुकीचा जल्लोष पाहायला दिसतोय. अशात मागील काही दिवसापासुन मात्र मणिपुरमध्ये हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. मणिपूरमध्ये 60 जागांसाठी येत्या २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यात मतदानाच्या दोन दिवस आधी शनिवारी रात्री चुराचंदपूर जिल्ह्यातील स्फोट झाला.
या स्फोटात एका लहान मुलासह दोन जण ठार आणि पाच जण जखमी झाले. गँगपिमुअल गावात हा स्फोट झाला.
या स्फोटात पाच जण जखमी झाले असुन लहान मुलासह दोन जणांचा मृत्यु झालाय.हा स्फोट कोणी घडवुन आणला याविषयी अद्याप माहिती नसुन पोलीस याविषयी अधिक तपास करत आहे.मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत यातील स्फोटाचे हे प्रकरण ही हिंसाचाराची पहिली मोठी घटना होती.
राज्यातील निवडणुकीशी संबंधित हिंसाचार वाढला असताना, मणिपुरचे राज्यपाल ला गानेसन यांनी काही दिवसापुर्वी हिंसाचार टाळण्याचे तसेच अनुचित प्रकार घडु नये आणि शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडावी असे आवाहन केले होते.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….