महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 27 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांपूर्वी मनसेने अमित ठाकरे यांच्याकडे दिलेली ही जबाबदारी खूपच महत्त्वाची मानली जात आहे. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. त्यामुळे या पदावर अमित ठाकरेंचीच नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी होत होती.
अखेर आज मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मनसेने अमित ठाकरे यांची या पदावर नियुक्ती केली आहे. या पदावर नियुक्ती करत मनसेने अमित राज ठाकरेंवर तरूण आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मनसेने या संदर्भात एक अधिकृत पत्रक काढलं आहे. आपल्या पत्रकात म्हटलं, “आज ‘मराठी भाषा गौरव’ दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे.”

विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद आदित्य शिरोडकर यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र, आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसे विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद रिक्त होतं. आता या पदावर अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सक्रिय झाले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी नुकताच डोंबिवलीचा दौराही केला होता. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. इतकेच नाही तर कोरोना, लॉकडाऊन आणि मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यांवरुनही अमित ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट केल्या होत्या.
खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा संताप काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन खड्ड्यांवरुन संताप व्यक्त केला होता. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जाम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय. पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..