देसाईसाहेब काळजी करू नका २०२४ पर्यंत लाल किल्ल्यावर शिवसेनेचीच घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या दिल्लीतील महत्वकांक्षा बोलून दाखवल्या.
आज आमची तिसरी पिढी आहे. मी लहानपणीपासून या सर्व नेत्यांना मंचावर बघतो. इतर पक्ष राजकीय नाटक करत असतात. पण आपण एक परिवार असतो. मराठीची चिंता दूर ठेवत आजचा दिवस साजरा करण्याचा आहे,असं ठाकरे म्हणाले.
मराठी भाषा कोणासमोर रुकणार नाही आणि झुकणारही नाही. ही दिल्लीला झुकवणारी भाषा आहे. कितीही हल्ले केले तरी झुकणारा नाही, असं प्रतिपादन ठाकरेंनी केलं. दिल्लीवाले अनेक गोष्टी घेऊन जात आहेत अशी भीती मंत्री सुभाष देसाईंनी वर्तवली. पण घाबरू नका.. आपण 2024 मध्ये दिल्लीत बसणार म्हणजे बसणार! असं ठाकरे म्हणाले.
मरीन लाईन या मराठी भाषेची इमारत उभारत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्र्यांनी केली. येणाऱ्या काळात या ठिकाणी मराठी परिषदा घेता येतील. मराठी रंगभूमीचे आपण दालन करणार आहोत, असं ते म्हणाले.
मराठी भाषेच्या शाळा कमी होतात या नेहमीच विषय आहे. हे सत्य आहे. त्यासाठी आपण उपाय करत आहोत. मुंबई महानगर पालिकेत 1200 शाळा आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या 11 शाळामध्ये सीबीएससी आणि आयसीएससी बोर्ड आणलंय. चार हजार जागांसाठी 10 हजार अर्ज आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. मात्र, या शाळामध्ये 10 वी पर्यंत मराठी देखील शिकवलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..