कृषिदुतांनी बनविले दुधापासून विविध पदार्थ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड- डॉ.पंजाबराव देशमुख कृषी वद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी मॉड्युल कार्यक्रमाअंतर्गत दुधापासून विविध पदार्थ बनविले.पनीर,खवा, श्रिखंड असे विविध लागणारे साहित्य व त्याची कृती यांचे प्रात्यक्षिक कृषिदुत यांनी करून दाखवले.
दुग्ध व्यवसाय हा शेतीस पूरक असा जोडधंदा आहे.बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे.सध्या दुधाला व दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी आहे.फक्त दूध विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार केल्यास दुधाचे आर्थिक मूल्य कित्येक पटीने वाढते. याबाबत कृषीकन्या कोमल काळबांडे,सजल राठोड व कृषीदुत सय्यद अनिस,शुभम वानखेडे व संजय राठोड यांनी पुढाकार घेऊन दुधापासून विविध पदार्थ कसे बनवायचे,बनविल्या कसे विकायचे व त्यापासून नफा कसा मिळवायचा या विषयी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य सचिन चिंतले सर व पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागाचे प्रा.सचिन देशमुख सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..