तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी घेतली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेंट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शिष्टमंडळाच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.
देशात केंद्रातील मोदी सरकारच्या जनहितविरोधी धोरणांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी राजकीय एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव य़ांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले होते. ते स्वीकारून केसीआर हे रविवार, 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आले. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच केसीआर हे मोदी सरकारच्या जनहितविरोधी धोरणाविरुद्ध छातीठोकपणे बोलतात. देशात मोदी सरकारविरोधी मोट बांधली जात आहे. त्यासाठी बिगरभाजपशासित राज्यांना एकत्र आणण्यासाठी केसीआर यांनी पुढाकार घेतला आहे. केसीआर यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीमुळे राज्य सरकार आणि विरोधीपक्षांची एकजूट करून देशपातळीवर भाजपविरोधी दबावगट तयार करण्याचा प्रयत्नांना अधिक गती मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….