स्पर्धा परिक्षेसाठी सिलॅबसप्रमाणे अभ्यास करणे आवश्यक :- जिल्हाधिकारी ; अब्दुल कलाम अभ्यासिकेत आय.ए.एस. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ; स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 19 फेब्रुवारी :- स्पर्धा परिक्षेचा अभ्यास म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास असून आपल्याला उत्कृष्ठतेकडे नेणारा प्रवास आहे. कुठल्याही स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा त्या परिक्षेचा सिलॅबस (अभ्यासक्रम) पुर्णपणे समजून घेणे व त्यानुसार आपला अभ्यास निश्चित करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले.
यवतमाळ येथील अब्दुल कलाम अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. उत्तीर्ण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन नियमीतपणे आयोजित करण्यास सुरवात करण्यात आली. त्याअंतर्गत आज जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरवकडा चे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन, दारव्हाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी आज स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले की परीक्षार्थींसाठी आम्ही मेंटोर (मार्गदर्शक) म्हणून आम्ही काम करू तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार या अभ्यासिकेत विषयवार व्याख्यानाचे (लेक्चर) आयोजन करण्यात येईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून आपणास प्रेरणा मिळावी म्हणून त्यांच्याकडून मार्गदर्शनाचा उपक्रम येथे दर आठवड्यात राबविण्यात येईल व आजपासून त्याची सुरूवात करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली, मुंबई न जाता यवतमाळ मध्ये राहूनही अभ्यास होऊ शकतो मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाप्रती (टारगेट) एकरूप राहणे व प्रत्येक विषयात अपडेट राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी टारगेट फोक्स करून अभ्यास करावा. लिखाणाचा सराव करावा. उत्तरे लिहितांना क्वालीटी पॉइंट कव्हर व्हावे. परिक्षा घेणाऱ्या आयोगाची भूमिका समजावून घेवून तयारी करावी. अभ्यासाचे चांगले विश्वासू सोर्स निवडावे. शासकीय संकेतस्थळाचा वापर करावा. प्लॅन बी नेहमी तयार ठेवावा. वेगवेगळ्या खात्यातील जास्तीत जास्त परिक्षा देता येईल असे पहावे. ही केवळ स्पर्धा परिक्षा आहे याची जाणीव ठेवावी. गुण कमी पडल्यास खचून जाऊ नये, यशासाठी परत प्रयत्न करावे व अभ्यासातून एक चांगला माणूस म्हणून आपण विकसित व्हावे, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या अभ्यासाचे धोरण ठरवणे महत्वाचे असल्याचे सांगितले. चुकातून शिकणे, ट्रॅक चेंज होऊ न देणे, योग्य पुस्तकांची निवड, आवश्यक तेवढेच वाचन व त्याची उजळणी, उत्तरे लिहण्यावर फोकस करणे, नेटवर जास्त सर्फींगऐवजी ठरवून निवडक अभ्यास करणे तसेच आपल्याला अभ्यासात मदत होईल अशा योग्य मित्रांमध्ये राहणे, त्यांचेशी गटचर्चा करणे, मुलाखतीसाठीही अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे फेसबुक पेज Dr-Shrikrishna-Panchal यावर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी विस्तुत माहिती दिली असून त्याचा वापर करावा असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी स्पर्धा परिक्षेचा निर्णय घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सरासरीपेक्षा जास्त अभ्यास व मेहनत आवश्यक असल्याचे सांगितले. अभ्यासात हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क महत्वाचे आहे. हा पीएचडीचा अभ्यास नसून परिक्षेच्या अभ्यासक्रमातील निवडक मुद्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. नैराश्य आल्यास शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घ्यावी असेही त्यांनी सांगितले. तर दारव्हाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी एम.पी.एस.सी. अभ्यासाबाबत माहिती देवून लक्ष विचलीत करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचे सांगितले.
जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी श्री. यादव, रंजना तलवरे, श्याम पंचभाई, श्री. बोरकर व अभ्यासिकेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..