राज ठाकरे निर्दोष ; जळगावच्या खटल्यात न्यायालयाचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी २००८ मध्ये राज ठाकरेंना (Raj Thackeray) अटक झाल्यानंतर जळगावात त्याचे पडसाद उमटले होते. शहरात बंदही पुकारण्यात आला होता.
याप्रकरणी जळगाव न्यायालयात दाखल खटल्यात राज ठाकरेंसह अन्य चौघांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली.
राज यांच्या अटकेचे पडसाद
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्याच्या मागणीसोबत उत्तर भारतीयांवरील हल्ल्याप्रकरणी सन २००८ मध्ये राज ठाकरेंवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्याविरोधात मनसेने (MNS) राज्यभर आंदोलनही केले. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ ला जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता.
याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चौघांना वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज यांना १५ हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी (ता.११) झाली. जळगाव न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात मनसेच्या वतीने अॅड. संदीप पाटील यांनी कामकाज बघितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….