आम्ही राजभवनात कधीतरी यायचो रोज नव्हे ; मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांना टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विरोधात असताना आम्ही राजभवनात कधीतरी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. पण रोज येत नव्हतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, नुतनीकरण केलेल्या वास्तुसाठी मला आनंद होत आहे.
राज्यातील राजभवन हे देशातील सर्वोत्तम असेल. हे राजभवन 50 एकरात असून येथील हवा ही थंड असते. राजकीय हवा कशी ही असू द्या, असाही टोला त्यांनी लगावला.
या वास्तुचा जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे जात आहोत. आधुनिकीकरणाच्या नावाखाली सर्व तोडून मोडून टाकले जाते. मात्र येथे जपलेले आहे. या नवीन वास्तुमध्ये आनंददायी घटना घडाव्यात अशी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरबार हॉलचे अप्रतिम असे सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला सुंदर झाडं, ज्याला शहरातील जंगल असे देखील म्हणता येईल. याने हे राजभवन अधिकच सुंदर झाले आहे. पावसाळ्यात थुई थुई नाचणारे मोर आहेत. अशी वास्तू शोधून सापडणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….