एसटी संपाचा तिढा सूटेना “तारीख पे तारीख”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यासाठी काल राज्य सरकारतर्फे मुंबई हायकोर्टात केला होता.
आज या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कारण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने दिलेली 12 आठवड्यांची मुदत संपली आहे. सरकारी वकिल एस नायडू यांनी पून्हा 18 फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितली आहे.
विलीनीकरणाचा अहवाल अंतिम टप्यात असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे. यावर न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार असून, 18 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सिल बंद पाकिटात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं ही मागणी घेऊन मागच्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत वेगवेगळे टप्पे पाहायला मिळाले आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख संघटनांच्या नेत्यांनी संप मागे घेतला असला तरी, बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलीनीरण होत नाही तोवर कामावर हजर होणार नाही अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे आता आणखी किती काळ एसटीची चाके थांबलेली राहणार याकडे राज्यातील सर्व सामान्य प्रवाशांचं लक्ष लागून आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….