गोव्यात स्मृती इराणी पोहचताच शिवसैनिकांची घोषणाबाजी ; अन्….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पणजी :- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गोव्यात आहेत. त्यांच्यासोबत संजय राऊत आणि इतर नेतेही प्रचारासाठी आले आहेत.
आज दिवसभरात सेनेने भाजवर टीकास्त्र सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. गोव्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. किरीट सोमय्या यांच्या नंतर आता प्रचारासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी शिवसैनिकांच्या आमने सामने आल्या. आक्रमक शिवसैनिकांना पाहून स्मृती इराणींनी तेथून काढता पाय घेतला.
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी या विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. आला रे आला कोण आला..शिवसेनेचा वाघ आला, आवाज कुणाचा..शिवसेनेचा, अशा घोषणा शिवसैनिक देत होते. त्यावेळी स्मृती इराणी यांच्या स्वागतासाठी फारसे भाजप कार्यकर्ते नव्हते. त्यामुळे आक्रमक शिवसैनिकांना पाहून स्मृती इराणींनी तेथून काढता पाय घेतला. त्या कारमधून बसून तेथून थेट निघून गेल्या.
गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणी या विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान आज किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सोमय्यां यांचे महानगरपालिकेच्या पायरीवरच सत्कार करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने त्याच पायऱ्यांचे गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केले. या प्रकारानंतर सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….